माथेरान अनलॉक करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागणी - In India Live

Breaking News

04/06/2021

माथेरान अनलॉक करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागणी

 

संतोष खाडे,माथेरान
दि.०४ माथेरान मधील सर्वांचे जीवन लॉक डाउन मुळे कोलमडले असून दैनंदिन जीवनात खूपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच येथील कोरोना रुग्णाची संख्या नगण्य प्रमाणात आहे.तरी शासनाने रायगड मधील  माथेरान  या पर्यटन स्थळाला लवकरात लवकर अनलॉक करा अश्या मागणीचे पत्र माथेरान मनसे अध्यक्ष संतोष कदम यांनी माथेरान नगरपालिकेला दिले.
माथेरान मध्ये कुठल्याही प्रकारची शेती अथवा औद्योगिक क्षेत्र नसल्याने येणाऱ्या पर्यटकांवर सर्वसामान्य नागरिकांन पासून ते मोठमोठया हॉटेल व्यावसायिक यांचे जीवनमान आणि उदरनिर्वाह चे साधन अवलंबून आहे.मागील वर्षाच्या कोरोना काळात आठ महिन्याचे लॉकडाउन  करण्यात आले होतें तरी आत्ताही याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पासून इथे सुद्धा लॉकडाउन  सुरू झाल्या मुळे अनेकांना नाइलाज मुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाह साठी अत्यंत कष्टदायक कामे यामध्ये हातगाडी ओढणे बिगारी ची कामे करावी लागत आहे.
पर्यटन सुरू झाल्या शिवाय इथल्या अशवपालांसह हातरिक्षा चालक,लॉज धारक, हमाल,कुली यांना सुद्धा या कठीण प्रसंगी खूप त्रास सहन करावा लागत आहे.इथल्या एकंदरीत भौगोलिक परिस्थिती चा विचार करता शासनाने माथेरान अनलॉक केल्या शिवाय स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत याकामी माथेरान मनसे शहर अध्यक्ष यांनी शासनाकडे पत्र व्यवहार केला आहे. 

No comments:

Post a Comment